उत्तराखंडमधील ड्रग्ज माफिया नेगीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:06 IST2021-05-12T04:06:42+5:302021-05-12T04:06:42+5:30
एनसीबीची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ड्रग्ज माफिया टायगर मुस्तफा याचा भागीदार भूपेंद्र नेगी याला उत्तराखंडमधील ...

उत्तराखंडमधील ड्रग्ज माफिया नेगीला अटक
एनसीबीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ड्रग्ज माफिया टायगर मुस्तफा याचा भागीदार भूपेंद्र नेगी याला उत्तराखंडमधील मंडी येथून अटक करण्यात आली. अमलीपदार्थ नियंत्रण कक्षच्या (एनसीबी) मुंबई युनिटने मंगळवारी ही कारवाई केली.
नेगी हा ड्रग्जच्या व्यवसायात मुस्तफाचा भागीदार असल्याने त्याच्या अटकेमुळे त्यांचे देशभरातील तस्करीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात एनसीबीने गोव्यातील ज्या हॉटेलमधून मुस्तफाला अटक केली होती, ते हॉटेलही नेगीच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात येते. २ मे रोजी एनसीबीने त्या हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले होते. टायगर मुस्तफाकडील चौकशीतून त्याचा भागीदार नेगी हा उत्तराखंडमध्ये मंडी येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या पथकाने नुकतेच त्याठिकाणी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. नेगीला ट्रान्झिस्ट रिमांडवर मुंबईला घेऊन येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
.............................