औषध गोदामावर छापा; पण तक्रार नाही
By Admin | Updated: May 12, 2015 03:37 IST2015-05-12T03:37:58+5:302015-05-12T03:37:58+5:30
तालुक्यातील काल्हेर गावात अरिहंत कम्पाउंडमधील केयूर औषध एजन्सीच्या गोदामावर सेंट्रल ड्रग कंट्रोल आॅर्गनायझेशन पथकाने छापा टाकून केवळ

औषध गोदामावर छापा; पण तक्रार नाही
भिवंडी : तालुक्यातील काल्हेर गावात अरिहंत कम्पाउंडमधील केयूर औषध एजन्सीच्या गोदामावर सेंट्रल ड्रग कंट्रोल आॅर्गनायझेशन पथकाने छापा टाकून केवळ इंजेक्शनचे नमुने घेऊन गेल्याने अफवांचे पीक आले आहे.
अरिहंत कम्पाउंडमध्ये बनावट औषधांचा साठा असल्याची माहिती मिळाल्याने केंद्रीय अन्न व औषधे प्रशासनाचे अधिकारी कविश्वर यांनी केयूर औषध एजन्सीच्या गोदामावर छापा टाकून दोन पंचांद्वारे औषधसाठ्याची तपासणी केली. मात्र, दबाव आल्याने सील करण्याची कारवाई थांबवून केवळ इंजेक्शनचे नमुने घेण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. यातील जीवनरक्षक व गर्भधारणेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनची किंमत प्रत्येकी ७४ हजार ३०० रुपये असून टोरिसेल इंजेक्शनचे ६७० नग व डेपो प्रोवेरा इंजेक्शनचे २००० नग मिळून ६ कोटी रुपयांची औषधे व इंजेक्शनचा साठा या गोदामात आढळून आला.