तरुणाचा बुडून मृत्यू; समुद्रकिनाऱ्यावर सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:25 IST2019-06-08T01:25:34+5:302019-06-08T01:25:41+5:30

शुक्रवारी सकाळी आक्सा बीचवर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याचे स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षावर कळविले

The drowning of the youth dies; Dead bodies found on the beach | तरुणाचा बुडून मृत्यू; समुद्रकिनाऱ्यावर सापडला मृतदेह

तरुणाचा बुडून मृत्यू; समुद्रकिनाऱ्यावर सापडला मृतदेह

मुंबई : भावासोबत मालाडच्या आक्सा बीचवर फिरायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

मालवणी गेट क्रमांक ८ मध्ये सैफ अली सिद्दिकी (२०) हा तरुण राहत होता. शुक्रवारी सकाळी आक्सा बीचवर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याचे स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षावर कळविले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत त्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासत मृत घोषित केले.

सैफ हा गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आक्सा बीचवर त्याचा भाऊ मोहम्मद करीम सिद्दिकी आणि दोन मित्र हकीम तसेच मोहम्मद साहील यांच्यासोबत फिरायला आला होता. पाण्यात खेळताना साडेसातच्या दरम्यान सैफ आपल्यासोबत नसल्याचे करीमच्या लक्षात आले. तेव्हा त्याने भावाला सर्वत्र शोधले. मात्र तो कुठेच सापडला नाही, त्यामुळे गुरुवारी रात्री एकच्या सुमारास तो हरवल्याची तक्रार त्याने मालवणी पोलीस ठाण्यात दिली.

त्यानंतर दुसºया दिवशी सैफचा मृतदेह सापडला. त्याची ओळख पटल्यावर त्याच्या घरच्यांना याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी सैफचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Web Title: The drowning of the youth dies; Dead bodies found on the beach