डहाणूत दोन वर्षांपासून रॉकेलटंचाई
By Admin | Updated: October 6, 2014 03:32 IST2014-10-06T03:32:15+5:302014-10-06T03:32:15+5:30
जव्हार येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाचा मनमानी कारभारामुळे आदिवासी बहुल असलेल्या डहाणू मतदार संघात गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड रॉकेल टंचाई

डहाणूत दोन वर्षांपासून रॉकेलटंचाई
शौकत शेख, डहाणू
जव्हार येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाचा मनमानी कारभारामुळे आदिवासी बहुल असलेल्या डहाणू मतदार संघात गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड रॉकेल टंचाई निर्माण झाली असून येथील दऱ्याखोऱ्यात, डोंगरकुशीत राहणाऱ्या द्रारिद्र्यरेषेखालील आदिवासी कुटुंबांना तसेच सर्व सामान्य नागरिकांना पेट्रोलपंपावरून डिझेल विकत घेऊन चूल पेटविण्याची वेळ आली आहे.
मुंबई लोकल थेट डहाणूपर्यंत येऊ लागल्याने झपाट्याने विकसीत होणाऱ्या डहाणू तालुक्याची लोकसंख्या साडेचार लाखपेक्षा अधिक आहे. नव्वद टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या या तालुक्यात ८५ ग्रामपंचायती असून १३० खेडेपाडे आहेत. तर ७५ हजार रेशन कार्डधारक आहे. त्यात ४५ हजार कुटुंबे दारिद्र्यरेषेखालीलचे जीवन जगत आहेत. डहाणूत गेल्या २५ वर्षांपासून उद्योगबंदी आहे. त्यामुळे रोजगाराची संधी नाही. परिणामी येथील बहुसंख्य आदीवासींना शासकीय धान्य तसेच रॉकेलचा मोठा आधार असतो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात मिळणाऱ्या रॉकेल साठ्यात कमालीची कपात केल्याने गावा, गावात रॉकेलची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे शासनाच्या नियमनानुसार गॅस कनेक्शन नसलेल्या शिधापत्रिका धारकांना प्रतिमाणशी एक लिटर रॉकेल देण्याचे तर एक सिलिंडर धारकांना प्रतिमाह दोन लिटर रॉकेल देण्याचे आदेश आहे. परंतू डहाणू पुरवठा विभागाला जव्हार जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून दर महा तीस रॉकेल टँकरची आवश्यकता असतान केवळ अठरा टँकरने रॉकेल पुरवठा केला जात आहे.