मुंबईत ड्रोनसदृश उपकरणांच्या उड्डाणावर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:32+5:302021-02-05T04:28:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरात ३१ जानेवारी ते १ मार्चपर्यंत ड्रोनसदृश ...

Drone-like equipment banned in Mumbai | मुंबईत ड्रोनसदृश उपकरणांच्या उड्डाणावर बंदी

मुंबईत ड्रोनसदृश उपकरणांच्या उड्डाणावर बंदी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरात ३१ जानेवारी ते १ मार्चपर्यंत ड्रोनसदृश उपकरणांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई, येथील मंदिरे, गर्दीची ठिकाणे कायमच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असतात. याआधीही मुंबईत घातपात घडवण्याचा इशारा देण्यात आला होता. दिल्लीतील शाहीन बागच्या धर्तीवर मुंबईतही पोलीस सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ३१ जानेवारी ते १ मार्चपर्यंत ड्रोन, रिमोटवर चालणारी छोटी विमाने, मायक्रोलाईट, पॅराग्लायंडिंगवर मुंबईत बंदी घालण्यात आली आहे. हे नियमित आदेश असून, नागरिकांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

* कलम १८८ म्हणजे काय?

- १८९७ साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार या काळात काही नियम लागू होतात. शासनाने निर्देशित केलेले सरकारी अधिकारी या अनुषंगाने वेगवेगळे आदेश देऊ शकतात किंवा काढतात. या आदेशांची पायमल्ली झाल्यास कलम १८८नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल हाेताे. कायदा मोडणाऱ्या व्यक्तीच्या कृत्यामुळे जीवित किंवा वित्तहानी झालीच पाहिजे, असेही नाही. नियम मोडला की, ती व्यक्ती गुन्हा दाखल करण्यास पात्र ठरते.

- या कायद्यातील तरतुदीनुसार फक्त आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात. दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले आणि त्यातून मानवी जीवन किंवा आरोग्य धोक्यात आले तर, त्या व्यक्तीस सहा महिने कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.

........................................

...................

Web Title: Drone-like equipment banned in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.