नशेत रिक्षा चालवणे बेतले चालकाच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:07 IST2021-09-04T04:07:32+5:302021-09-04T04:07:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नशेत रिक्षा चालविणे चालकाच्या जीवावर बेतले. बोरिवलीच्या गोराई परिसरात हा प्रकार गुरुवारी घडला. याप्रकरणी ...

नशेत रिक्षा चालवणे बेतले चालकाच्या जीवावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नशेत रिक्षा चालविणे चालकाच्या जीवावर बेतले. बोरिवलीच्या गोराई परिसरात हा प्रकार गुरुवारी घडला. याप्रकरणी चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक चौकशी सुरू आहे.
गोराई रिक्षा स्टॅन्डजवळ हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकुंद क्षीरसागर हे मीरा रोडचे राहणारे आहेत. त्यांनी गोराई रिक्षा स्टॅन्डजवळ रिक्षा पकडली. त्या रिक्षेचा चालक हा नशेत असल्याने निष्काळजीपणाने गाडी चालवत होता. ज्यामुळे त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि रिक्षा पलटी झाली. ज्यात क्षीरसागर यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र चालक गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोराई पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, प्रवाशावर उपचार करत त्यांना सोडून देण्यात आले आहे.