वाहनचालकांना पोस्टाच्या सीएफसी सेन्टरमधून अर्ज भरता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:11 IST2021-01-13T04:11:49+5:302021-01-13T04:11:49+5:30
मुंबई : वाहनचालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यास अडचणी येतात. त्यामुळे ते एजंटकडे जातात. त्यांची फसवणूक होऊ शकते. मात्र पोस्टाच्या सीएफसी ...

वाहनचालकांना पोस्टाच्या सीएफसी सेन्टरमधून अर्ज भरता येणार
मुंबई : वाहनचालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यास अडचणी येतात. त्यामुळे ते एजंटकडे जातात. त्यांची फसवणूक होऊ शकते. मात्र पोस्टाच्या सीएफसी सेन्टरमधून अर्ज भरण्याबाबत पोस्ट विभागाला प्रस्ताव दिला आहे. पोस्ट विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे लवकरच वाहनचालकांना पोस्टाच्या सीएफसी सेन्टरमधून आरटीओ संबंधित अर्ज भरता येतील, अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.
याबाबत अविनाश ढाकणे म्हणाले की, पोस्टमध्ये ६५० सीएफसी सेन्टर सुरू केले आहेत. त्यामुळे कोणत्या एजंटकडे न जाता आरटीओ संबंधित अर्ज भरता येईल. याबाबत पोस्टाच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा झाली आहे.
सोबतच इंडिया पोस्टचे चांगले व्होलेट आहे. वाहनचालकांना इतर ठिकाणी जाण्याची गरज पोस्टाची चांगली सेवा आहे. पेमेंट बँकेचा वापरही आरटीओसाठी करता येईल. त्यामुळे पोस्टाला महसूल मिळेल तसेच वाहनचालकांचे काम सोपे होईल, त्यांची फसवणूक टळेल असेही ढाकणे म्हणाले.