वृद्धेला टेम्पाेची धडक देणारा चालक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:16 IST2020-12-04T04:16:14+5:302020-12-04T04:16:14+5:30

मुंबई : चेंबूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या ६७ वर्षीय वृद्धेला धडक देणाऱ्या चालकाला चेंबूर पोलिसांनी बुधवारी अटक केली. ज्ञानेश्वर मारुती श्रावणे ...

The driver who hit the old man with a tempo was arrested | वृद्धेला टेम्पाेची धडक देणारा चालक अटकेत

वृद्धेला टेम्पाेची धडक देणारा चालक अटकेत

मुंबई : चेंबूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या ६७ वर्षीय वृद्धेला धडक देणाऱ्या चालकाला चेंबूर पोलिसांनी बुधवारी अटक केली. ज्ञानेश्वर मारुती श्रावणे असे त्याचे नाव आहे. त्याच्या टेम्पोच्या धडकेमुळे चेंबूरच्या सिंधी कॅम्प परिसरात राहणाऱ्या शकुंतला अंभीरे (६७) यांचा यात मृत्यू झाला.

.....

राशिद शेखविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई

मुंबई : ट्रॉम्बे परिसरातील कुख्यात गुंड राशिद शेख व त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. महिन्याभरात मोक्का अंतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे. आतापर्यंत १८ आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी १३ जण कारागृहात आहेत. ट्रॉम्बे पोलिसांनी ही कारवाई केली.

Web Title: The driver who hit the old man with a tempo was arrested