Join us  

निवडणुकीपूर्वी मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होणे अवघड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 6:28 AM

आगामी विधानसभेपूर्वी एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ या दोन मार्गिका सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न होता, मात्र हे दोन मार्ग सुरू होण्यास पुढचे वर्ष उजाडणार आहे.

मुंबई : आगामी विधानसभेपूर्वी एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ या दोन मार्गिका सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न होता, मात्र हे दोन मार्ग सुरू होण्यास पुढचे वर्ष उजाडणार आहे. पुढीलवर्षी जानेवारीमध्ये साधारणत: हे मार्ग सुरू होतील. या दोन मेट्रो मार्गिकांपैकी एकतरी मेट्रो मार्गिका निवडणुकीपूर्वी सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांनी एमएमआरडीएला दिले होते. मात्र अद्याप या दोन्ही मेट्रो मार्गिकांचे ८० टक्केच काम पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यांत आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. यामुळे उर्वरित काम महिन्याभरात पूर्ण होणे शक्य नसल्याने निवडणुकीपूर्वी एकतरी मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एमएमआरडीएकडून दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो-२ आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो-७ या दोन मार्गिकांचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पाचे ३०० किलोमीटर अंतराचे जाळे विणण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापैकी १८० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम प्रगतीपथावर असून ५० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या आखणीचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहेत.काम पूर्ण होण्यासाठी लागणार पाच महिने९० किलोमीटरपेक्षा अधिक मेट्रो मार्गिकांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कामही सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष काम मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ या मार्गिकांचे काम वेगाने सुरू आहे. परंतु, अद्याप पाच महिने हे काम पूर्ण होण्यासाठी लागतील. यामुळे हे उर्वरित काम महिन्याभरानंतर सुरू होणाऱ्या आचारसंहितेपूर्वी करण्याची शक्यता मावळली आहे.

टॅग्स :मेट्रोमुंबई