Join us  

घराचे स्वप्न महागणार; किमतीत वाढ होणे अटळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 5:44 AM

कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचा परिणाम

ठळक मुद्देबांधकामांच्या दरांवर कच्च्या मालाच्या किमतींचा माेठा परिणाम हाेताे. त्यातच काेराेना महामारीमुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काेराेना महामारीच्या काळात बांधकाम क्षेत्राला माेठा फटका बसला हाेता. हे क्षेत्र महामारीच्या आधीपासून संकटात हाेते. त्यातून सावरत नाही ताेच आता स्टील, सिमेंट इत्यादी कच्च्या मालाच्या किमतींमध्ये माेठी वाढ झाल्यामुळे घरे महागण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येऊ शकतो.

बांधकामांच्या दरांवर कच्च्या मालाच्या किमतींचा माेठा परिणाम हाेताे. त्यातच काेराेना महामारीमुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले हाेते. लाॅकडाऊनमुळे अनेक महिने बांधकाम ठप्प झाल्याने अनेक प्रकल्प लांबणीवर पडले. त्यामुळे या क्षेत्राला खूप नुकसान साेसावे लागले. आता या क्षेत्राला सरकारने मदत केली आहे. बॅंकांनीही गृहकर्जाच्या व्याजदरांमध्ये माेठ्या प्रमाणात कपात केली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये घरे स्वस्त झाली हाेती. परिणामी विक्री वाढून या क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला. मात्र कच्च्या मालाच्या किमतींमध्ये माेठी वाढ झाल्यामुळे घरांच्या किमती सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढू शकतात, असा अंदाज आहे. क्रेडाई एमसीएचआयचे संचालक प्रीतम चिवूकूला यांनी सांगितले, की कच्च्या मालाच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची आम्ही विनंती केली आहे. सध्या सण आणि उत्सवांच्या काळात घरखरेदी वाढली आहे. मात्र, किमती वाढल्यास त्यावर परिणाम हाेऊ शकताे. ताेडगा न निघाल्यास घरांच्या किमती वाढविण्याशिवाय बांधकाम व्यावसायिकांसमोर पर्याय नाही.

n रिअल इस्टेट क्षेत्राने जाेरदार उसळी घेतली आहे. मात्र, कच्च्या मालाच्या किमती कमी न झाल्यास घरांच्या किमतीत लवकरच १० ते १२ टक्के वाढ हाेऊ शकते, तर पुढील सहा ते आठ महिन्यांमध्ये १५ ते २० टक्क्यांनी घरे महाग हाेऊ शकतात, असे काही जणांचे म्हणणे आहे.n स्टीलच्या सळ्या, सिमेंट, प्लॅस्टिक, पीव्हीसी पाइप्स, तांबे, ॲल्युमिनियम इत्यादींच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत. 

टॅग्स :सुंदर गृहनियोजन