Join us

ड्रीम गर्ल मेट्रोच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 10:43 IST

पश्चिम उपनगरातील वाहतुकीला कंटाळून बॉलीवूड अभिनेत्री आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मंगळवारी चक्क मेट्रोने प्रवास केला.

मुंबई :

पश्चिम उपनगरातील वाहतुकीला कंटाळून बॉलीवूड अभिनेत्री आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मंगळवारी चक्क मेट्रोने प्रवास केला. दहीसर येथून डीएननगर येथे मेट्रोने दाखल झालेल्या हेमा मालिनी यांनी मेट्रो प्रवासाचे तोंडभरून कौतुक केले असून, याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेटो ७ सुरू करण्यात आली असून, या मेट्रोचे प्रवासी दिवसागणिक वाढतच आहेत. आता तर सेलिब्रिटीही मेट्रोचा प्रवास करू लागले असून, हेमा मालिनी यांनीही या मेट्रोतून प्रवास करत मेट्रो प्रवासाचे कौतुक केले आहे. हेमा मालिनी सोशल मीडियावरील ट्वीटमध्ये म्हणतात की, दोन तासांचा प्रवास करून मी कारने दहीसर येथे आले. या प्रवासाने कंटाळा आल्याने मी मेट्रोतून प्रवासाचा निर्णय घेतला. 

मेट्रो अत्यंत आनंददायी असून, हा प्रवास सुखाचा झाला. डीएननगर येथे दाखल झाल्यानंतर मी रिक्षा पकडून जुहू येथे आली. या प्रवासामुळे वेळ वाचला असून, प्रवास सुखकर झाला. हेमा मालिनी यांच्या या प्रवासावर सोशल मीडियावर स्तुतिसुमने उधळण्यात आली असून, वेळ वाचविणाऱ्या मेट्रोच्या प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे.

टॅग्स :हेमा मालिनी