Join us  

नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना, लीलावती रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 12:02 PM

काही दिवसांपासून होम क्वारंटाइन होते विजय केंकरे

मुंबई : कोरोनाने सर्वच क्षेत्रातील लोकांना आपल्या विळख्यात अडकवले आहे. सिनेमा व नाट्य क्षेत्रही त्यातून सुटलेले नाही. आता प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना सौम्य ताप येत होता. त्यामुळे ते होम क्वारंटाइन होते, मात्र आता त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच विजय केंकरे यांची आई ललिता केंकरे यांचं नुकतंच निधन झाले होते.त्यानंतर विजय केंकरे घरीच होते.

गुरुवारी त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेले आठ ते नऊ दिवस त्यांना ताप येत होता. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली अशी माहिती अभिनेते विनय येडेकर यांनी दिली.

विजय केंकरे यांनी अनेक यशस्वी नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. सुयोग या संस्थेची सर्वाधिक नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली आहे. दिग्दर्शक म्हणून आपल्या शैलीचा एक वेगळा ठसा त्यांनी रंगभूमीवर उमटवला. भाई व्यक्ती की वल्ली आणि मुंबई पुणे मुंबई या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिकांचंही कौतुक झालं आहे. दरम्यान त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अभिनेते विनय येडेकर यांनी दिली.

टॅग्स :मुंबईनाटकसिनेमाकोरोना सकारात्मक बातम्या