गटारे नव्हे कचराकुंड्या

By Admin | Updated: March 13, 2015 22:56 IST2015-03-13T22:56:38+5:302015-03-13T22:56:38+5:30

पालघर तालुक्यात पूर्व भागात येणाऱ्या मनोर ग्रामपंचायत परिसरातील गटारांच्या कचरा कुंड्या झाल्या असून ती प्लॅस्टीक बाटल्या आणि इतर

The drainage is not trash | गटारे नव्हे कचराकुंड्या

गटारे नव्हे कचराकुंड्या

मनोर : पालघर तालुक्यात पूर्व भागात येणाऱ्या मनोर ग्रामपंचायत परिसरातील गटारांच्या कचरा कुंड्या झाल्या असून ती प्लॅस्टीक बाटल्या आणि इतर कचऱ्यांनी तुडूंब भरलेली दिसत आहेत. मात्र ग्रामपंचायत कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाई करीत नाही व स्वत: साफसफाईकडे दुर्लक्ष करीत आहे.
ग्रामपंचायत हद्दीत मनोर पालघर मुख्य रस्त्यालगत असलेले गटारांचा उपयोग मलमूत्राचा व घाण पाण्याचा निचरा करण्यासाठी त्याचा वापर सध्या कचरा टाकण्यासाठी केला जातो. अशी परिस्थिती सध्या आहे. मात्र कचरा टाकणाऱ्या लोकांवर ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही शिवाय स्वत: देखील साफसफाई करीत नाही. पावसाळा जवळ आला की ग्रामपंचायतकडून गटारांच्या साफसफाईवर लाखो खर्च करण्यात येतात. पण, तरी गटारे मात्र, स्वच्छ दिसत नाहीत. मनोर ग्रामपंचायत हे परिसरातील ५० ते ६० गावांची बाजारपेठ असल्यामुळे वर्दळ असते. तसेच स्वच्छतेअभावी डासांचे प्रमाणात वाढ झाली आहे. रोगराई पसरली आहे ताप, खोकला, सर्दी, अशा विविध प्रकारच्या आजारांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते आहे. गेल्या तीन महिन्यापासून सरपंच पद रिक्त असल्याने महत्वाचे कामे रखडली आहेत. (वार्ताहर)

Web Title: The drainage is not trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.