१६ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार याद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST2021-02-05T04:30:09+5:302021-02-05T04:30:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नवी मुंबई, वसई- विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, तसेच इतर विविध १६ महानगरपालिकांतील ...

The draft voter lists will be released on February 16 | १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार याद्या

१६ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार याद्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नवी मुंबई, वसई- विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक

निवडणुकांसाठी, तसेच इतर विविध १६ महानगरपालिकांतील २५ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता १६ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी मंगळवारी दिली.

मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर ३ मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. ८ मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर १२ मार्च रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती मदान यांनी दिली.

विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे पुढीलप्रमाणे : नाशिक- ४अ, धुळे- ५ब, परभणी- ११ब, १४क, ठाणे- ३०अ, १५ड, २३ड, अहमदनगर- ९क, नांदेड वाघाळा- १३अ, नागपूर- ८ब, मीरा भाईंदर- १०ड, मालेगाव- २०क, पिंपरी चिंचवड- १ड, १४अ, ४ब, उल्हासनगर- १४ड, ८क, सोलापूर- ६क, सांगली मिरज कुपवाड- १६अ, अकोला- ४अ, ८क, ३क, भिवंडी निजामपूर- ९ब, पुणे- ८क आणि २९ब.

Web Title: The draft voter lists will be released on February 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.