Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. तात्याराव लहाने आज वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 02:04 IST

सायंकाळी सात ते आठ या वेळात लोकमत यू ट्युब आणि फेसबुकवरून प्रश्नांची उत्तरे देणार

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने हे सोमवारी लोकमतच्या वाचकांना सायंकाळी सात ते आठ या वेळात लोकमत यू ट्युब आणि फेसबुकवरून प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. कोरोनाच्या काळात निर्माण झालेली परिस्थिती, लोकांच्या मनात येत असलेल्या शंका, कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने उचललेली पावले, या अनुषंगाने ते वाचकांशी संवाद साधणार आहेत. सोमवारी १० आॅगस्ट रोजी सायंकाळी सात ते आठ या वेळात ही लाईव्ह प्रश्नोत्तरे होतील. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांना लोकमत युट्युब अथवा फेसबुकवर सहभागी होता येईल.