मुंबई : बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी परिसरातील सांडपाण्याच्या पाइपलाइनमध्ये आढळला.एलफिन्स्टन येथे बुधवारी अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पाणी भरल्याने डॉ. अमरापूरकर यांनी गाडी सोडून पायी घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ३६ तास ते बेपत्ता होते. त्यांच्या मृत्यूला पालिका जबाबदारआहे. मॅनहोल उघडे ठेवणे हा गुन्हाम्हणावा लागेल, असे इंंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. सुधीर पाटील म्हणाले.डॉ. अमरापूरकर यांचे आजाराबाबतचे निदान योग्य असायचे. पटकन ते निदान करायचे. रुग्णांचा त्यांच्यावर विश्वास होता. देशाच्या कानाकोपºयातून रुग्ण बॉम्बे हॉस्पिटलमध्ये येत असत.- डॉ. श्रीरंग बिच्चू, बॉम्बे रुग्णालय
डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 05:33 IST