डॉ. आंबेडकर मोफत पुस्तक पेढीची सुरवात
By Admin | Updated: June 25, 2015 00:49 IST2015-06-25T00:49:41+5:302015-06-25T00:49:41+5:30
जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जव्हारच्या धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. आंबेडकर मोफत पुस्तक पेढीची सुरवात
जव्हार : जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जव्हारच्या धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तक पेढीची सुरवात के. व्ही. हायस्कूल, जव्हार येथे करण्यात आली. या प्रसंगी इ. ९ वी व १० वीच्या भारती विद्यापीठ प्रशाला व के. व्ही. हायस्कूल, जव्हार यातील प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांना अभ्यसक्रमाच्या पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वत: दिनेश भट यांनी केले. त्यांनी या पुस्तक पेढीच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला, आज केवळ १०० विद्यार्थ्यांना पुस्तक दिली जात असली तरी पुढे अधिकाअधिक गरजू विद्यार्थ्यांना यात समाविष्ट केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या पुस्तक पेढीची व्याप्ती अधिक मोठी करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. तसेच या पुस्तक पेढीचे सभासद शुल्क रू. १०००/असून जास्तीत जास्त इच्छुकांनी या पुस्तक पेढीचे सभासद व्हावे असे आवाहन केले.
याप्रसंगी के.व्ही.हायस्कूल, भारती विद्यापीठ प्रशाला, आश्रमशाळा, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, जव्हार यांच्या वतीने दिनेश भट यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
या कार्यक्रमास जेष्ठ भाजपा नेते विष्णूपंत मुकणे, अॅड. राजाराम मुकणे, के. व्ही. हायस्कूलचे मुख्याध्यापक महाले सर, प्राध्यापक अनिल पाटील, प्रफुल्ल पवार, दिलीप पटेकर, शेळके सर, चित्रांगण घोलप माजी उपनगराध्यक्ष संदीप मुकणे, नदिम चाबुक्सवार, राजेंद्र दशपुत्र, परेश पटेल, मोहसीन चाबुकस्वार, सागर सावंत, तसेच शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)