Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. संजय मुखर्जी यांची सिडकोच्या ‘एमडी’पदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 05:36 IST

सिडको; मुंबईच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ.संजय मुखर्जी यांची शासनाने मंगळवारी नियुक्ती केली.

मुंबई : सिडको; मुंबईच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ.संजय मुखर्जी यांची शासनाने मंगळवारी नियुक्ती केली.मुखर्जी यांनी कोरोनाकाळात वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच अन्न व औषधी प्रशासन सचिव म्हणून अतिशय चांगले काम केले. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १५ दिवसांच्या आत कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले. या ठिकाणी कोरोनामुळे गंभीररीत्या आजारी असलेल्यांवर उपचार केले जातात. आता त्यांना सिडकोसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पाठविले आहे. ते मूळ नागपूरकर आहेत.