सहायक आयुक्तांच्या सल्ल्याने ‘डीपी’!
By Admin | Updated: May 31, 2015 02:02 IST2015-05-31T02:02:51+5:302015-05-31T02:02:51+5:30
आपल्या वॉर्डाची गरज काय? मूलभूत सुविधांचा अभाव कोणत्या भागात आहे? वॉर्डात कोणत्या सुधारणा होणे आवश्यक आहे? याबाबत विभाग अधिकाऱ्याला अधिक माहिती असते़

सहायक आयुक्तांच्या सल्ल्याने ‘डीपी’!
मुंबई : आपल्या वॉर्डाची गरज काय? मूलभूत सुविधांचा अभाव कोणत्या भागात आहे? वॉर्डात कोणत्या सुधारणा होणे आवश्यक आहे? याबाबत विभाग अधिकाऱ्याला अधिक माहिती असते़ त्यामुळे सुधारित विकास नियोजन आराखड्यात चुका टाळण्यासाठी सर्वच २४ वॉर्डांतील सहायक आयुक्तांचा सल्ला या वेळी घेण्यात येणार आहे़
सन २०१४-२०३४च्या विकास नियोजन आराखड्यातील शिफारशींवर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली़ पुरातन वास्तूंना वगळले, कोळीवाडे व गावठाणांची झोपडपट्टीमध्ये गणना, पुरातन धार्मिक स्थळांच्या आवारातून रस्त्याचा प्रकल्प अशा अनेक त्रुटींमुळे हा आराखडा वादग्रस्त ठरला़ अखेर सामाजिक व राजकीय दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आराखड्याला एप्रिल महिन्यात स्थगिती दिली़ त्यानुसार सुधारित आराखडा तयार करण्यासाठी पालिकेला चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे़
हे काम जलद गतीने करण्यासाठी रामनाथ झा या सनदी अधिकाऱ्याची विशेष अधिकारी या पदावर प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे़ या समितीने आपल्या कामाला सुरुवातही केली आहे़ मात्र या वेळेस सुधारणेनंतर आराखडा पुन्हा एकदा प्रकाशित करण्यापूर्वी स्थानिक वॉर्डातील सहायक आयुक्तांना दाखविण्यात येणार आहे़ जेणेकरून आपल्या वॉर्डासाठी तरतूद करताना नियोजनात काय कमी पडले? याची जाणीव हे अधिकारी करून देतील, असा विश्वास एका अधिकाऱ्याने व्यक्त केला़ (प्रतिनिधी)
च्मुंबईतील १५०० पुरातन वास्तूंपैकी एक हजार वास्तू व परिसर विकास आराखड्यातून वगळण्यात आले़
च्पुरातन वास्तू संवर्धन समितीचे अधिकार कमी करून श्रेणी ३मधील पुरातन वास्तूच्या दुरुस्तीच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार स्थायी समिती व पालिका सभागृहाला देण्याच्या शिफारशीमुळे वाद़
च्पुरातन वास्तू परिसरातील इमारतींच्या उंचीवरील मर्यादा शिथिल करणे़ यामुळे पुरातन वास्तू व परिसराचे अस्तित्व धोक्यात़
च्हाजी अली दर्गा निवासी व व्यसायिक क्षेत्र दाखविणे, माहीम दर्गाच्या ठिकाणी अनाथाश्रम, पुरातन चर्चमधून रस्ता प्रस्तावित करणे, विलेपार्ले येथील पुरातन वास्तू असलेल्या चर्चच्या जागेवर अनाथाश्रमाचे आरक्षण़
च्८८ कोळीवाडे, ३२ गावठाणांची झोपडपट्टी म्हणून गणना़ गावठाणातील घरांवरील रस्ता प्रस्तावित, पुरातन क्रॉसही धोक्यात़
च्गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीतील मोठा हरित पट्टा विकासासाठी खुला़ आरे कॉलनीत कचरा डेपोवर आक्षेप़
च्पारसी धर्मीयांच्या अग्यारी, २४ फायर टेम्प आराखड्यातून वगळले़
च्कुर्ला ते चेंबूर हा रासायनिक व औद्योगिक वसाहतींमुळे धोकादायक पट्ट्याच्या आपत्कालीन सुरक्षेबाबत विकास आराखडा मौऩ
च्रेल्वे स्थानक परिसरात एफएसआय पाच ते आठपर्यंत वाढविण्याच्या शिफारशीवर टीकास्त्ऱ विकासकांना फायदा व अमर्याद विकासाचा आरोप़
च्झोपडपट्टी व फेरीवाल्यांना आराखड्यातून वगळले़ त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे़