बेकायदा बांधकामांना दुप्पट दंड
By Admin | Updated: August 17, 2014 00:48 IST2014-08-17T00:48:17+5:302014-08-17T00:48:17+5:30
बेकायदा इमारती अथवा बांधकामांवर कारवाई होईर्पयत अनेक वर्षे लोटत असल्याने पालिकेचा महसूल मात्र बुडत आह़े

बेकायदा बांधकामांना दुप्पट दंड
>मुंबई : बेकायदा इमारती अथवा बांधकामांवर कारवाई होईर्पयत अनेक वर्षे लोटत असल्याने पालिकेचा महसूल मात्र बुडत आह़े त्यामुळे अशा बेकायदा बांधकामांना दंड ठोठावण्याच्या सुधारित नियमाचा वापर आता पालिका करणार आह़े यामुळे बेकायदा बांधकामांना अधिकृत करदात्यांच्या दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार आह़े
बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी पालिकेचा स्वतंत्र विभाग कार्यरत आह़े तरीही कधी राजकीय अभय तर कधी बेकायदा बांधकामाचे मालक न्यायालयातून स्थगिती आणत असल्याने या प्रकरणावर निकाल लागेर्पयत अनेक वर्षे लोटतात़ त्यामुळे या बांधकामांकडून दंड वसूल करण्यासाठी पालिकेने नवीन युक्ती काढली आह़े पुढच्या वर्षीपासून याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आह़े मुंबईत 1 एप्रिल 2क्1क् च्या पूर्वलक्षी प्रभावाने भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली लागू करण्यात आली आह़े (प्रतिनिधी)
मुंबई महापालिका कायदा 1888 मधील कलम 152(ए) अनुसार बेकायदा बांधकामांना हा दंड ठोठाविणो शक्य आह़े हा दंड अधिकृत मालमत्ताधारकांना आकारण्यात येणा:या कराच्या दुप्पट असणार आह़े एप्रिल 2क्1क् मध्ये कायद्यात ही सुधारणा करण्यात आली आह़े
च्मुंबईत भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली लागू केल्यानंतर आता मालमत्ताधारकाच्या नावानेच बिल काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आह़े आजच्या घडीला मालमत्तेची दोन सहामाही बिले मालमत्ताधारकांना पाठविण्यात येतात़
च्यामध्ये एक बिल फ्लॅट मालक तर दुसरे बिल सोसायटीला पाठविले जात़े यास मोठय़ा प्रमाणात विरोध होऊ लागला़ त्यामुळे नवीन कर आकारणीच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणण्यासाठी फ्लॅट मालकाच्याच नावाने बिल काढण्याचे पालिकेने ठरविले आह़े
स्वतंत्र बिलाचा फायदा
मुंबईत एकूण दोन लाख हाऊसिंग सोसायटय़ा आहेत़ तर दोन लाख 72 हजार मालमत्ताधारक आहेत़ या सोसायटय़ांना हा बदल कळविण्यात येणार आह़े नवीन करप्रणाली जागेच्या भांडवली मूल्यावर अवलंबून असल्याने आपल्याला किती कर आकारला जात आहे, हे नागरिकांना कळू शकणार आह़े