दिवाळीतही ‘डबल डेकर’!

By Admin | Updated: September 16, 2014 02:48 IST2014-09-16T02:48:52+5:302014-09-16T02:48:52+5:30

प्रिमियम एसी डबल डेकर ट्रेनला गणोशोत्सवात अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेकडून ही ट्रेन आता दिवाळीत चालवण्यात येणार आहे.

'Double Decker' in Diwali! | दिवाळीतही ‘डबल डेकर’!

दिवाळीतही ‘डबल डेकर’!

मुंबई : प्रिमियम एसी डबल डेकर ट्रेनला गणोशोत्सवात अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेकडून ही ट्रेन आता दिवाळीत चालवण्यात येणार आहे. मात्र या वेळी ती प्रिमियम म्हणून न चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे.  एलटीटी ते करमाळी अशी ट्रेन दिवाळीत धावतानाच तिच्या 44 फे:या होणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. 
गणोशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणा:या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने प्रिमियम एसी डबल डेकर ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या ट्रेनच्या 20 फे:या चालवण्यात आल्या. मात्र प्रिमियम ट्रेन असल्याने या ट्रेनचे भाडे मागणीनुसार फारच वाढत होते. हे पाहता मध्य रेल्वेने दिवाळीत कोकणवासीयांसाठी एसी डबल डेकर ट्रेन पुन्हा चालवतानाच ती मात्र प्रिमियम म्हणून न चालवण्याचा निर्णय  घेतला आहे. एलटीटी ते करमाळी (पावसाळी वेळापत्रकानुसार) अशा 32 फे:या आणि एलटीटी ते करमाळी (पावसाळी वेळापत्रकानुसार नाही) या 12 फे:या होतील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. या ट्रेनचे आरक्षण नंतर सांगण्यात येणार आहे.  महत्त्वाची बाब म्हणजे गणोशोत्सवात सोडण्यात आलेल्या विशेष गाडय़ांमधून 1 लाख 36 हजार 183 प्रवाशांनी प्रवास केला.  (प्रतिनिधी)
 

 

Web Title: 'Double Decker' in Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.