वरवरा राव यांना १४ डिसेंबरपर्यंत रुग्णालयातून हलवू नका - उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:19 IST2020-12-04T04:19:33+5:302020-12-04T04:19:33+5:30
एल्गार परिषद प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेले कवी वरवरा राव यांची प्रकृती सुधारत ...

वरवरा राव यांना १४ डिसेंबरपर्यंत रुग्णालयातून हलवू नका - उच्च न्यायालय
एल्गार परिषद प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेले कवी वरवरा राव यांची प्रकृती सुधारत असून त्यांना १४ डिसेंबरपर्यंत नानावटी रुग्णालयातून हलवू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने तळाेजा कारागृह प्रशासनाला गुरुवारी दिले. राव यांना १८ नोव्हेंबर रोजी नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा आहे. त्यांना १४ डिसेंबरपर्यंत रुग्णालयातच राहू द्या, असे निर्देश न्यायालयाने दिले. न्यायालयाने या याचिकेवर १४ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.