Join us

रात्रीच्या संचारबंदीसाठी आम्हाला प्रवृत्त करू नका; महापालिका आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:44 IST

५६० जणांकडून ४३ हजारांचा दंड वसूल

मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकत्र येऊन केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर महानगरपालिकेचे लक्ष आहे. याच पार्श्वभूमी सांताक्रुझ, लोअर परळ, दादर, तसेच वांद्रे परिसरातील पब आणि हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगरण्यास सुरुवात करण्यात आली असून, ५६० जणांकडून ४३ हजार रुपये दंडाच्या स्वरूपात आकारण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेला रात्रीच्या वेळी संचारबंदी (कर्फ्यू) लावण्यास प्रवृत्त करू नका, असे आवाहन पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी मुंबईकरांना सोमवारी केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांताक्रुझमधील बॉम्बे अड्डा या पबमध्ये धाड टाकली. यावेळी २७५ व्यक्तींनी मास्क घातले नव्हते. त्यानुसार, पालिकेने त्यांना ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दादरच्या प्रीतम हॉटेलमध्येही १२० जणांवर आणि रुड लॉजवरही अशीच कारवाई करण्यात आली. लोअर परळ, वांद्रे परिसरातही मास्क न घालणाऱ्या, तसेच फिजिकल डिस्टन्सचे नियम न पाळणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करत ५६० जणांकडून पालिकेने दंडाच्या स्वरूपात ४३ हजार २०० रुपये वसूल केले.कोरोना अजूनही संपलेला नाहीकोरोना अजूनही संपलेला नाही, याचे भान मुंबईकरांनी ठेवावे आणि गर्दी करणे, मास्क लावणे हे नियम पाळावे, अशी विनंती चहल यांनी केली. आम्ही रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या विरोधात आहोत. त्यामुळे बेशिस्तपणे वागून आम्हाला ती लागू करण्यास प्रवृत्त करू नका, अशा भाषेत त्यांनी नागरिकांना समजही दिली.