नागरिकांच्या जिवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नये - दिलीप वळसे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST2021-09-02T04:13:06+5:302021-09-02T04:13:06+5:30
मुंबई : राजकीय पक्षांनी नागरिकांच्या जिवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका, असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ...

नागरिकांच्या जिवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नये - दिलीप वळसे-पाटील
मुंबई : राजकीय पक्षांनी नागरिकांच्या जिवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका, असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी भाजप व मनसेच्या नेत्यांना नाव न घेता लगावला आहे.
भाजप व मनसेने राज्यातील मंदिरे उघडी करावीत आणि दहीहंडी साजरी करण्याला परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सर्व जगात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे. ही लाट आली तर त्याचा परिणाम मोठा होऊन संपूर्ण राज्याला त्याचा तोटा होऊ शकतो. राजकीय पक्षांनी लोकांच्या जिवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नये.
सहकार कायद्याने काय परिणाम होणार, याबाबत आज चर्चा झाली. सहकार कायद्याने होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक विचारगट स्थापन करण्यात आला आहे. या गटाचा अहवाल आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.