Join us

बड अन् ड्रॉपने कान स्वच्छ करू नका, महागात पडेल; योग्य काळजी घेण्याचे कान-नाक, घसा तज्ज्ञांचे नागरिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 10:16 IST

मात्र, अशा पद्धतीने कान साफ करणे धोक्याचे ठरू शकते.  कानाची निगा राखायची असेल तर अशा पद्धतीचे मार्ग अवलंबणे चुकीचे आहे.

मुंबई : अनेकवेळा कानात मळ साचला किंवा कानात खाज आल्यामुळे  कान स्वच्छ करण्यासाठी अनेकजण बडचा वापर करतात. तर काहीजण ड्रॉपचा वापर करून कान साफ करतात.

मात्र, अशा पद्धतीने कान साफ करणे धोक्याचे ठरू शकते.  कानाची निगा राखायची असेल तर अशा पद्धतीचे मार्ग अवलंबणे चुकीचे आहे. कान स्वच्छ करण्याची नैसर्गिक प्रक्रिया अविरत सुरू असते, असे मत कान नाक घसा तज्ज्ञांनी सांगितले.

अवयव बदलून जगण्याचा मूलभूत अधिकार सर्वांनाच; रुग्णांसाठी स्वतंत्र विशेष नोंदणी सुविधा

कानातील केस, चिकट द्रव हेच मोठे रक्षक

कानाच्या आतील भागात असणारे केस आणि काही वेळा स्वतःहून कानाबाहेर येणारा चिकट द्रव हे कानाच्या संरक्षणाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे अनेकवेळा धुळीचे कण कानात जाण्यास ते मज्जाव करत असतात.

कानात बड नकोच

कानात बडचा वापर करू नये, असे सातत्याने डॉक्टरांतर्फे सांगितले जाते. मात्र तरीही अनेकवेळा बडचा वापर केला जातो. काहीवेळा अनेकांना बड कानाच्या किती खोलवर गेले आहे याचा अंदाज येत नाही.  त्यामुळे कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असून संसर्ग होऊ शकतो. बड न वापरणे केव्हाही योग्य आहे.

कानाची स्वच्छता कशी कराल?

निरोगी कान राखण्यासाठी आंघोळ करताना कान हलक्या हाताने मऊ कापडाने स्वच्छ करण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. तसेच, कॉटन बडसह कोणत्याही वस्तू कानात घालणे टाळा, कारण कानाला हानी पोहोचवू शकतात.

ओपीडीत ७० टक्के रुग्ण कानाच्या आजाराचे असतात. त्यामध्ये कानात बड घालून संसर्ग झालेले काही रुग्ण असतात. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी तर कानात बड घालू नये. त्यामुळे त्यांना कानात जखम हाेऊन मोठी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.  

डॉ. शशांक म्हशाळ,