Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरकामगार, वाहनचालक सुरक्षारक्षकांची तपासणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 06:55 IST

पालिकेने कोरोना चाचणी केली बंधनकारक

मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक इमारतींमध्ये घरकाम करणारे, वाहनचालक आदींना प्रवेश दिला आहे. मात्र, उत्तुंग इमारतींमध्ये बाधित रुग्णांचे प्रमाणही आता वाढत असल्याने यापुढे सुरक्षारक्षक, सफाई कामगार, वाहनचालक या सर्वांची कोरोना चाचणी करून घेणे मुंबई महापालिकेने सर्व निवासी इमारतींना बंधनकारक केले आहे.

मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, यापुढे निवासी इमारतींमध्ये वाहनचालक, सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची आरोग्य चाचणी करून घेणे आवश्यक आहे. महापालिकेने अनेक विभागांमध्ये फिरते दवाखाने सुरू केले आहेत, तिथे या कर्मचाऱ्यांची आरोग्यतपासणी करता येईल. याची जबाबदारी निवासी इमारतींच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायची असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.चाचण्या वाढवणारमुंबईत सध्या दररोज सुमारे १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. पालिकेची मोबाइल व्हॅनहीप्रत्येक परिमंडळात फिरून रुग्णांना शोधत आहे. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये चाचणीचे प्रमाण वाढवून १८ ते २० हजारपर्यंत नेण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. त्यानुसार, सर्व सहायक आयुक्तांना नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकामगार