जूनअखेरीस येणार डोंबिवलीत पाइप गॅस
By Admin | Updated: February 11, 2015 23:00 IST2015-02-11T23:00:01+5:302015-02-11T23:00:01+5:30
अनेक महिने महानगर गॅस कंपनीतर्फे पाईपलाईन टाकण्याचे काम अंबरनाथपासून कल्याण पूर्वेकडील काटेमानिवली पुलाजवळ सिग्नलच्या जंक्शनला रखडले होते.

जूनअखेरीस येणार डोंबिवलीत पाइप गॅस
अनिकेत घमंडी, डोंबिवली
अनेक महिने महानगर गॅस कंपनीतर्फे पाईपलाईन टाकण्याचे काम अंबरनाथपासून कल्याण पूर्वेकडील काटेमानिवली पुलाजवळ सिग्नलच्या जंक्शनला रखडले होते. येथे खोदकामासाठी वाहतूक शाखेसह मनपाकडून परवानगी मिळत नसल्याच्या अनेक तांत्रिक समस्या खा. श्रीकांत शिंदे यांनी डिसेंबर महिन्यातच निकाली काढ्ल्यानंतर या कामाला वेग आला आहे़ यामुळे जून अखेरीस डोंबिवलीकरांना पाईप गॅसची सुविधा मिळणार असल्याची खुषखबर महानगरच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बुधवारी संतोष सामंत यांच्यासह खासदारांचे स्वीय सहाय्यक प्रफुल्ल देशमुख यांनी एमआयडीसीतील कामाची पाहणी केली. त्यावेळी या कामात काहीही अडचणी असल्यास सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले. आधी एमआयडीसी रहिवाशांच्या परिसरातील काम पूर्ण होत असून त्यांना जूनमध्ये ही सुविधा मिळणार आहे.