डोंबिवलीत सायकल रॅली
By Admin | Updated: April 1, 2015 00:12 IST2015-04-01T00:12:44+5:302015-04-01T00:12:44+5:30
रोटरी क्लब, डोंबिवली वेस्टच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रोटरी आणि इनरव्हील क्लब, डोंबिवली वेस्ट प्रबोधनात्मक उपक्रम राबवित आहेत.

डोंबिवलीत सायकल रॅली
डोंबिवली : रोटरी क्लब, डोंबिवली वेस्टच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रोटरी आणि इनरव्हील क्लब, डोंबिवली वेस्ट प्रबोधनात्मक उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार, २८ मार्च रोजी रस्त्यावरील वाहतूक आणि नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत स्कूटर-बाइक आणि सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी सहपोलीस आयुक्त व्ही. लक्ष्मीनारायण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.