Join us

डोंबिवली लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत; फेऱ्या वाढवण्याची सुप्रिया सुळेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 16:31 IST

डोंबिवलीमधील लोकलच्या गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.

मुंबई: डोंबिवलीमधीललोकलच्या गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. डोंबिवली स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या असते. त्यातच डोंबिवली लोकल असूनदेखील ती लोकल कल्याण स्थानकावरुन सुटत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारने तातडीने याकडे लक्ष घालण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

सुप्रिया सुळे यांनी डोंबिवली लोकलमध्ये जास्त गर्दी आणि लोकलमध्ये वेळेचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित केला. कल्याण स्थानकावरुन येणारी ट्रेन जेव्हा डोंबिवलीला येते तेव्हा गर्दीने पूर्ण भरलेली असते. त्यामुळे डोंबिवलीकरांना ट्रेनमध्ये चढणं अशक्य होतं. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे मी वारंवार तक्रार केली. मात्र यावर अजूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. 

सुप्रिया सुळेंनी नियम ३७७ च्या अंतर्गत तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींनुसार हा मुद्दा उपस्थित करत लवकरात लवकर डोंबिवली स्थानकावरुन सुटणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

टॅग्स :सुप्रिया सुळेमध्य रेल्वेलोकलप्रवासीडोंबिवली