डॉली बिंद्राला जामीन मंजूर

By Admin | Updated: June 5, 2014 01:38 IST2014-06-05T01:38:55+5:302014-06-05T01:38:55+5:30

टीव्ही रिअॅलिटी शोमधील कलाकार डॉली बिंद्रा हिला दिंडोशी न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला़

Doli Bindra granted bail | डॉली बिंद्राला जामीन मंजूर

डॉली बिंद्राला जामीन मंजूर

>मुंबई :  टीव्ही रिअॅलिटी शोमधील कलाकार डॉली बिंद्रा हिला दिंडोशी न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला़
बिंद्रा हिचा सोसायटीमधील रहिवाशांसोबत गेल्या महिन्यात वाद झाला़ याप्रकरणी पोलिसांनी बिंद्रा व तिची आई जसवंत कौर बिंद्राविरोधात बेकायदा जमाव व दंगलीचा गुन्हा नोंदवला़ यात होणारी अटक टाळण्यासाठी बिंद्रा व तिच्या आईने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला़ स्वत:च्या घराबाहेर जमाव केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही़ त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी बिंद्रा व तिच्या आईने न्यायालयात केली़ ती मंजूर करीत न्यायालयाने या दोघींना अटकपूर्व जामीन मंजूर केला़  

Web Title: Doli Bindra granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.