कुत्र्याने घेतला चिमुकलीचा बळी
By Admin | Updated: March 31, 2015 02:13 IST2015-03-31T02:13:51+5:302015-03-31T02:13:51+5:30
येथील खुटारी गावातील एका ४ वर्षाच्या मुलीचा कुत्रा चावल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

कुत्र्याने घेतला चिमुकलीचा बळी
तळोजा : येथील खुटारी गावातील एका ४ वर्षाच्या मुलीचा कुत्रा चावल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
तळोज्यातील खुटारी गावातील सिताराम म्हात्रे चाळ दुलबहाद्दूर साऊ यांची ४ वर्षांची मुलगी प्रतीक्षा आपल्या आई बाबांसोबत रविवारी रात्री घरात झोपली असताना गावातील भटक्या कुत्र्याने झोपेत असलेल्या तिच्या गळयाच्या उजव्या बाजुला चावा घेतला. यात प्रतिक्षेच्या मानेच्या रक्तवाहिन्या मोठयाप्रमाणात फाडून निघाल्या. तिला कामोठे एमजीएम येथे उपचारासाठी नेले असता तिचा मृत्यू झाला. तळोजा, कळंबोली, पनवेल, खारघर, कामोठा परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नियंत्रण आणणे कठीण बनले
आहे. (वार्ताहर)