Join us

लेखी हमीनंतरच कूपरमधील डॉक्टरांचे आंदोलन मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:04 IST

Mumbai News: कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन अखेर मंगळवारी मागे घेतले. महापालिका प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर कूपर निवासी डॉक्टर संघटनेने हे आंदोलन मागे घेतले.

मुंबई  - कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन अखेर मंगळवारी मागे घेतले. महापालिका प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर कूपर निवासी डॉक्टर संघटनेने हे आंदोलन मागे घेतले.

कूपर रुग्णालयातील तीन डॉक्टरांना  रुग्णाच्या नातेवाइकांकडून शनिवारी मध्यरात्री मारहाण केली होती. त्यानंतर निवासी डॉक्टरांनी हे काम बंद आंदोलन सुरू केले होते. कूपर रुग्णालयात महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी तीन महिन्यांच्या आत आणि शक्य झाल्यास एक महिन्याच्या आत तैनात केले जातील. अतिरिक्त सुरक्षा कायम ठेवणे आणि सध्या रुग्णालयात कार्यरत असलेले २४ अतिरिक्त बीएमसी सुरक्षा महाराष्ट्र सुरक्षा बल प्रत्यक्षात येईपर्यंत कायम ठेवले जातील, असे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cooper Hospital Doctors End Strike After Written Assurance

Web Summary : Cooper Hospital resident doctors called off their strike after receiving written assurance from the municipal administration regarding their demands, following an assault on three doctors. Security will be enhanced with Maharashtra Security Force deployment within three months and additional BMC security retained until then.
टॅग्स :मुंबई