केईएममधील डॉक्टरांचा संप मागे
By Admin | Updated: September 27, 2015 15:13 IST2015-09-27T14:50:54+5:302015-09-27T15:13:19+5:30
मुंबईतील केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर रविवारी मागे घेण्यात आला आहे.

केईएममधील डॉक्टरांचा संप मागे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - मुंबईतील केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. डॉक्टरांना मारहाण करणा-या चौघा आरोपींना अटक केल्यानंतर व महापौर, आरोग्य मंत्र्यांच्या आश्वासनानंतर डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याने चिडलेल्या नातेवाईकांनी दोन दिवसांपूर्वी केईएममधील तीन डॉक्टरांना लोखंडी सळीने मारहाण केली होती. या मारहाणीनंतर केईएममधील ३५० निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन सुरु होते. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी चौघा आरोपींना अटक केली. तसेच महापौर व आरोग्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्यावर डॉक्टरांनी संप मागे घेतला. संप मागे घेतल्याने केईएममध्ये येणा-या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. रविवारी संध्याकाळी पाचपरर्यंत निवासी डॉक्टर कामावर परतणार असल्याचे डॉक्टरांच्या संघटनेतर्फे सांगण्यात आले.