डॉक्टरांना मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ
By Admin | Updated: October 29, 2015 00:16 IST2015-10-29T00:16:15+5:302015-10-29T00:16:15+5:30
गेल्या काही वर्षांपासून डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत राज्यातील १४ पैकी ११ वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयांमध्ये

डॉक्टरांना मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत राज्यातील १४ पैकी ११ वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयांमध्ये २० डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत.
रुग्ण अत्यवस्थ असताना जेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येते, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी डॉक्टर अथक प्रयत्न करतात. पण काही वेळा त्यांना अपयश येते. रुग्णाचा मृत्यू होतो. असा प्रकार घडल्यास नातेवाइकांकडून डॉक्टरला शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षतेची भावना आहे. निवासी डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ जुलै महिन्यात मार्डने राज्यव्यापी मासबंक केला होता. त्यानंतर सुरक्षा वाढवण्यात येईल, असे आश्वासन मिळाले होते. पण, मासबंकनंतरही असे प्रकार घडले.