डॉक्टरला मारहाण; चेंबूर येथे तणाव
By Admin | Updated: August 24, 2014 01:29 IST2014-08-24T01:29:20+5:302014-08-24T01:29:20+5:30
चेंबूरच्या अशोक नगरमधील सूर्या क्लिनिकच्या डॉ. शशी सुमन याला स्थानिकांनी चोप दिल्याची घटना घडली. हा डॉक्टर बोगस असल्याचे स्थानिकांचे म्हणणो आहे.
डॉक्टरला मारहाण; चेंबूर येथे तणाव
मुंबई : चेंबूरच्या अशोक नगरमधील सूर्या क्लिनिकच्या डॉ. शशी सुमन याला स्थानिकांनी चोप दिल्याची घटना घडली. हा डॉक्टर बोगस असल्याचे स्थानिकांचे म्हणणो आहे.
आनंद नाडर याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे तो सुमन यांच्या क्लिनिकमध्ये गेला असता त्याला कंबेरवर इंजेक्शन दिले. मात्र इंजेक्शनमुळे त्याच्या पायाला गाठ आली आणि त्याचा उजवा पाय निकामी झाला. यामुळे शनिवारी आनंदला रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. याची माहिती मिळताच स्थानिकांनी क्लिनिकवर हल्लाबोल केला. त्यानंतर या डॉक्टरला मारहाण केली. तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता.