डॉक्टर मधू निमकर ठरल्या मिसेस कॉन्फिडन्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:34 IST2020-12-17T04:34:42+5:302020-12-17T04:34:42+5:30

मुंबई : साहित्य आणि सौंदर्य क्षेत्रांमध्ये आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या डॉक्टर मधू निमकर यांची या स्पर्धेत मिसेस कॉन्फिडन्ट म्हणून ...

Doctor Madhu Nimkar became Mrs. Confident | डॉक्टर मधू निमकर ठरल्या मिसेस कॉन्फिडन्ट

डॉक्टर मधू निमकर ठरल्या मिसेस कॉन्फिडन्ट

मुंबई : साहित्य आणि सौंदर्य क्षेत्रांमध्ये आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या डॉक्टर मधू निमकर यांची या स्पर्धेत मिसेस कॉन्फिडन्ट म्हणून निवड करण्यात आली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित क्वीन ऑफ साउथ मुंबई २०२० सीजन टू या सौंदर्य स्पर्धेची १४ डिसेंबर रोजी सांगता झाली. दक्षिण मुंबईमधून अनेक सौंदर्यवतींनी या बहुचर्चित स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या डॉक्टर मधू निमकर यांनी बाजी मारली. टाळेबंदीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये गृहिणीने आत्मविश्वासाने कसे सामोरे जावे, याचे प्रत्यक्ष उदाहरण साहित्यिक मधू निमकर यांनी आपल्या कृतीतून दर्शविले, असे मान्यवर परीक्षकांनी नमूद केले. साहित्य कला संस्कृती क्रीडा सामाजिक शैक्षणिक अशा अष्टपैलू विचारांनी प्रेरित मधू निमकर यांनी दिलेले आत्मविश्वास आणि प्रोत्साहनयुक्त उत्तर त्यांच्या मिसेस कॉन्फिडन्टसाठी उपयुक्त ठरले.

Web Title: Doctor Madhu Nimkar became Mrs. Confident