Dr Gauri Gajge Case: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूच्या प्रकरण आता नवी माहिती समोर आली आहे. गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप होता, ज्याला आता प्राथमिक शवविच्छेदन अहवालाने बळ दिले आहे. डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे डॉक्टरांच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
प्राथमिक अहवालातील धक्कादायक खुलासा
डॉ. गौरी यांच्या शवविच्छेदन प्रक्रियेत सहभागी असलेले डॉ. राजेश ढेरे यांनी नुकतीच माध्यमांना यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात ओपिनिअन रिझर्व्हड एव्हिडन्स ऑफ नेगेचर कम्प्रेशन ऑफ नेक असा उल्लेख आहे. या तांत्रिक शब्दाचा प्राथमिक अर्थ डॉ. गौरी यांचा मृत्यू गळ्यावर दाब पडल्यामुळे झाला असावा असा आहे. प्राथमिक अहवालात मृत्यूचे स्वरूप अनैसर्गिक असल्याचे नमूद आहे. तसेच मृत्यूचे अंतिम कारण मात्र अद्याप राखून ठेवण्यात आले आहे.
मृत्यूचे संभाव्य कारण जे आम्ही शवविच्छेदन अहवालानंतर देतो त्यामध्ये ओपिनिअन रिझर्व्हड एव्हिडन्स ऑफ नेगेचर कम्प्रेशन ऑफ नेक आणि कंसात अनैसर्गिक असं दिलेले आहे, असं डॉ. राजेश ढेरे म्हणाले. डॉ. ढेरे यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाचा पूर्णपणे वैज्ञानिक अभ्यास सुरू आहे. प्रयोगशाळेतील नमुन्यांचे अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि अंतिम अहवाल तयार केला जाईल.
अनंत गर्जेला अटक
कुटुंबीयांनी डॉ. गौरी यांची हत्या झाली असल्याचा आणि त्यांना मारहाण केली जात असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर वरळी पोलिसांनी तातडीने कारवाई केली.पोलिसांनी डॉ. गौरी यांचे पती अनंत गर्जे यांच्यासह नणंद आणि दिराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
फॉरेन्सिक पुराव्यांवर लक्ष
प्राथमिक शवविच्छेदन अहवालातील गळ्यावर दाब पडल्याच्या अंदाजामुळे आता पोलिसांना या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करावा लागणार आहे. पोलीस पथक फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करत आहे. मृतदेहावरील जखमा, खुणा किंवा इतर तपशील अंतिम अहवालात समाविष्ट केले जाणार आहेत. लॅब रिपोर्ट आणि इतर माहिती मिळाल्यानंतर डॉ. ढेरे आणि त्यांचे पथक अंतिम अहवाल तयार करून तो पोलिसांना सोपवणार आहेत.
दरम्यान, डॉ. गौरी गर्जे यांच्या पार्थिवावर त्यांच्या सासरी पाथर्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Web Summary : Dr. Gauri Garje's death is unnatural, preliminary autopsy reveals. Pressure on the neck suggested. Husband arrested, investigation underway. Forensic evidence is being collected.
Web Summary : डॉ. गौरी गर्जे की मौत अप्राकृतिक है, प्रारंभिक शव परीक्षा से पता चला। गर्दन पर दबाव का सुझाव दिया गया। पति गिरफ्तार, जांच जारी। फोरेंसिक सबूत एकत्र किए जा रहे हैं।