Join us  

मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावेंचा कोरोनामुळे मृत्यू, १० तास बेडच मिळाला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 2:08 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: विशेष म्हणजे, कोरोनाची लागण झाल्यानंतर डॉक्टर चित्तरंजन भावे हे स्वत:च गाडी चालवत रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले.

ठळक मुद्देभावे यांनी रहेजा हॉस्पिटलमध्ये एका अत्यावस्थ असलेल्या कोरोना रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती.हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी तब्बल 10 तास वाट पाहावी लागली

मुंबई : मुंबईतील जीएसएमसीचे शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि मुलगी श्रद्धा असा परिवार आहे. 

डॉक्टर चित्तरंजन भावे हे कान-नाक-घसा तज्ज्ञ होते. गेल्या काही दिवसांपूर्वी डॉक्टर चित्तरंजन भावे यांनी रहेजा हॉस्पिटलमध्ये एका अत्यवस्थ असलेल्या कोरोना रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती. मात्र, यानंतर त्यांनाच कोरोनाची लागण झाली. 

विशेष म्हणजे, कोरोनाची लागण झाल्यानंतर डॉक्टर चित्तरंजन भावे हे स्वत:च गाडी चालवत रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. मात्र, कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या या डॉक्टरांनाच हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी तब्बल 10 तास वाट पाहावी लागली.

डॉक्टर चित्तरंजन भावे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुबीयांवर शोककळा पसरली आहे. याशिवाय, मुंबईतील डॉक्टरांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, डॉक्टर चित्तरंजन भावे यांना कोरोना झाल्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलीला क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

आणखी बातम्या...

"युवराज सिंग माफी माग", सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी

अमेरिकेत दंगली रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करणार, ४००० नागरिकांना अटक

राहुल गांधीही 'मन की बात' करणार?, लवकरच ऑनलाइन पॉडकास्ट सुरू करण्याची शक्यता 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस