बीडीडी चाळ, कोहिनूर व स्प्रिंग मिलचा पुनर्विकास करू

By Admin | Updated: October 8, 2014 02:12 IST2014-10-08T02:12:19+5:302014-10-08T02:12:19+5:30

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला नायगाव येथील बीडीडी चाळ, कोहिनूर व स्प्रिंग मिल चाळींचा पुनर्विकास तत्काळ करू

Do the redevelopment of BDD Chal, Kohinoor and Spring Mill | बीडीडी चाळ, कोहिनूर व स्प्रिंग मिलचा पुनर्विकास करू

बीडीडी चाळ, कोहिनूर व स्प्रिंग मिलचा पुनर्विकास करू

मुंबई : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला नायगाव येथील बीडीडी चाळ, कोहिनूर व स्प्रिंग मिल चाळींचा पुनर्विकास तत्काळ करू, असे आश्वासन भाजपाचे वडाळा मतदारसंघातील उमेदवार मिहिर कोटेचा यांनी प्रचार रॅलीत रहिवाशांना दिले़
कोटेचा यांनी नायगाव विभागातील प्रचार रॅलीत येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेत त्या तत्काळ पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही कोटेचा यांनी येथील दिली़
महत्त्वाचे म्हणजे कोहिनूर मिल व स्प्रिंग चाळींच्या भूखंडांचा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाशी थेट संबंध आहे़ सध्या भाजपाचे केंद्रात सरकार आहे़ त्यामुळे या चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यात काहीच अडचणी येणार नसल्याचेही कोटेचा यांनी सांगितले.
तसेच बीडीडी चाळीतील रहिवाशांनीही आपल्या व्यथा कोटेचा यांच्यासमोर या वेळी मांडल्या़ या चाळीतील शौचालयांची समस्या, दोन चाळीतील लादीकरण नसल्याने होणारी परवड अशा अनेक समस्या येथील रहिवाशांनी कोटेचा यांना बोलून दाखवल्या़ त्यावर कोटेचा यांनी या समस्या तातडीने सोडवल्या जातील, असे आश्वासन दिले़ त्याचबरोबर बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्याला प्राधान्य दिले जाईल, अशी हमीदेखील कोटेचा यांनी येथील रहिवाशांना दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: Do the redevelopment of BDD Chal, Kohinoor and Spring Mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.