अंत्यसंस्कारासाठी लाकडे नकोत
By Admin | Updated: August 9, 2014 02:11 IST2014-08-09T02:11:00+5:302014-08-09T02:11:00+5:30
एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साधारत: 6क्क् किलो लाकूड लागत असून, यासाठी भारतात दरवर्षी 66 लाख वृक्षांची छाटणी होत आहे.

अंत्यसंस्कारासाठी लाकडे नकोत
>मुंबई : एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साधारत: 6क्क् किलो लाकूड लागत असून, यासाठी भारतात दरवर्षी 66 लाख वृक्षांची छाटणी होत आहे. परिणामी मृतदेहांच्या संस्कारांसाठी वापरण्यात येणा:या लाकडांमुळे वायु प्रदूषणात भर पडत असून, यासाठी वृक्षांची मोठया प्रमाणावर कत्तल केली जात आहे. त्यामुळे मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी विद्युतदाहिनी अथवा पर्यायी इंधनाची सक्ती करण्याचे साकडे राज्यपाल के. शंकरनारायणन यांना घालण्यात आले आहे.
मुंबईतील एका जागृत पर्यावरणवाद्याने राज्यपालांना यासंदर्भातील निवेदन दिले असून, त्यानुसार; देशाची लोकसंख्या सुमारे दीड अब्जांच्या आसपास आहे. आणि मृत्यूदराचे प्रमाण दर हजार व्यक्तीमागे 11 च्या आसपास आहे. भारतात वर्षाला 1 कोटी 10 लाख मृत्यू होतात. हिंदू धर्मात अंत्यसंस्काराच्या पद्धतीनुसार मृतदेहाला अग्नी देण्यासाठी लाकडांचा वापर होतो. एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साधारत: 6क्क् किलो लाकूड लागते.
त्यामुळे भारतात दरवर्षी 66 लाख वृक्षांची छाटणी होते. शिवाय अंत्यसंस्कारादरम्यान लाकडे जाळण्यात आल्याने होणारे वायूप्रदूषण वेगळेच आहे. महत्वाचे म्हणजे मृतदेहांवरील अंत्यसंस्करासाठी गॅसदाहिनी, विद्युतदाहिनी, डिङोल दाहिनी असे पर्याय उपलब्ध झाले आहेत. शहरात याचा वापर होत असला तरी याबाबत सक्ती करण्यात आली तर वृक्षांची होणारी कत्तल थांबेल; शिवाय पर्यावरणालाही हातभार लागेल. (प्रतिनिधी)
पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पुढाकार
च्राज्याची लोकसंख्या 11 कोटी 24 लाखांच्या आसपास असून, देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे. राज्यात मोठया प्रमाणावर नागरीकरण झाले असून, 45.2 टक्के लोक नागरी भागात राहतात. राज्यात दरदिवशी मृत्यूमुखी पडणा:यांची संख्या मोठी असून, मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर केला जातो. यावर पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याची सक्ती संबंधित प्रशासनाला केली तर वृक्षतोड थांबेल; अशी कळकळीची विनंती राज्यपालांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.