नव-याच्या जिवावर निवडून आलेल्यांनी शिकवू नये - मनसे गटनेत्याचे उद्गार
By Admin | Updated: November 27, 2014 08:47 IST2014-11-27T01:06:35+5:302014-11-27T08:47:44+5:30
नव-याच्या जिवावर निवडून आलेल्याने मला शिकवू नये, नगरसेविकेला उद्देशून केलेल्या मनसे गटनेत्याच्या या उद्गारांमुळे मनसे आणि भाजपामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली़.

नव-याच्या जिवावर निवडून आलेल्यांनी शिकवू नये - मनसे गटनेत्याचे उद्गार
मुंबई : नव-याच्या जिवावर निवडून आलेल्याने मला शिकवू नये, नगरसेविकेला उद्देशून केलेल्या मनसे गटनेत्याच्या या उद्गारांमुळे मनसे आणि भाजपामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली़. त्यामुळे धनुष्यबाण हातात धरायचा की घडय़ाळाच्या काटय़ाबरोबर चालायचे, हा राज्यातील वाद आता पालिकेच्या दरबारात पोहोचला आह़े. राज्य सरकारवर टीका करणा-या मनसेच्या गटनेत्याला नगरसेवकपद टिकवण्याचा टोला भाजपा नगरसेविकेने आज मारला़. त्यामुळे संतापलेल्या गटनेत्याने त्यांना नव-याच्या जिवावर निवडून आलेल्याने मला शिकवू नये, असे प्रत्युत्तर दिले. परिणामी मनसे आणि भाजपामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या वेळी काँग्रेसही मनसेच्या इंजीनमध्ये बसले, तर शिवसेनेने मात्र शांत राहण्यातच शहाणपण मानले.
डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या आणि सायन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बलात्कारपीडित
मुलीला चांगली सेवा मिळत
नसल्याचा विषय विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी निवेदनाद्वारे पालिकेच्या महासभेत मांडला़ या वेळी आपले मत मांडताना मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी भाजपा सरकारवर हल्ला चढविला़ यामुळे
खवळलेल्या भाजपा नगरसेविका ज्योती अळवणी यांनी आपले नगरसेवकपद आधी टिकवा, असा टोला हाणला़ हा टोमणा जिव्हारी लागलेल्या देशपांडे यांनी नव:याच्या जिवावर निवडून आलेल्यांनी मला नगरसेवकपद टिकवण्यास सांगू नये, असे प्रत्युत्तर दिल़े
या विधानामुळे संतप्त भाजपाच्या नगरसेविकांनी देशपांडे यांना घेराव घालून घोषणाबाजी सुरू केली़ त्यामुळे महापौरांनी सभा 1क् मिनिटांसाठी तहकूब करून गटनेत्यांना महापौर दालनात बोलावल़े महापौरांच्या मध्यस्थीनंतर देशपांडे यांनी कोणाला दुखविण्याचा आपला हेतू नव्हता, असे स्पष्ट करीत क्षमा मागितली़
मात्र भाजपाच्या आमदार मनीषा चौधरी यांनी मनसेवर टीकास्त्र सोडल्यामुळे पुन्हा मनसे विरुद्ध भाजपा असा सामना रंगला़ त्यामुळे महापौरांनी सभागृह नेता आणि प्रशासनाला बोलण्याची संधी देऊन विषय मिटवला़ (प्रतिनिधी)
सभागृहात नगरसेवकांनी गोंधळ घातल्यास थेट प्रशासनाला बोलण्याची संधी देऊन विषय मिटवण्याची कला तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांना अवगत होती़ सभागृहावर जरब ठेवण्यात त्यांचा हातखंड होता़ नगरसेवक पदाच्या पहिल्याच टर्ममध्ये महापौर बनलेल्या स्नेहल आंबेकर यापूर्वी गोंधळून जात होत्या़ मात्र आज त्यांनी थेट मोर्चा सांभाळत कोणाला बोलू देणो हा महापौरांचा अधिकार आहे, असे सदस्यांना ठणकावल़े
संतप्त भाजपाच्या नगरसेविकांनी देशपांडे यांना घेराव घालून घोषणाबाजी केली़ त्यामुळे महापौरांनी सभा 1क् मिनिटांसाठी तहकूब केली.
हिवाळ्यात डेंग्यू घटला
23 नोव्हेंबर 63, 24 नोव्हेंबर 48, 25 नोव्हेंबर 58 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत़ यापूर्वी डेंग्यूचे दोनशे रुग्ण सरासरी सापडत होत़े आता हे प्रमाण दरदिन 5क् एवढे आह़े हिवाळा सुरू झाल्यामुळे डेंग्यूचे रुग्णही घटले असल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केला़