कुर्ला, घाटकोपरमध्ये पाणी बिलेच नाहीत
By Admin | Updated: December 11, 2014 01:02 IST2014-12-11T01:02:59+5:302014-12-11T01:02:59+5:30
पाणीपट्टी भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असली तरी बिलच वेळेत मिळत नसल्याने नागरिक हैराण असल्याची तक्रार नगरसेवकांकडून होत आह़े

कुर्ला, घाटकोपरमध्ये पाणी बिलेच नाहीत
मुंबई : पाणीपट्टी भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असली तरी बिलच वेळेत मिळत नसल्याने नागरिक हैराण असल्याची तक्रार नगरसेवकांकडून होत आह़े कुर्ला आणि घाटकोपरमध्ये आठ महिन्यांपासून पाण्याचे बिल ग्राहकांर्पयत पोहोचले नाही़ त्यामुळे थकलेल्या पाणीपट्टीवरील दंड चुकविण्यासाठी नागरिकानाच बिलासाठी पायपीट करावी लागत आह़े
तलावांमध्ये मुबलक जलसाठा असल्यामुळे पुढच्या पावसाळ्यार्पयत मुंबईला पाण्याचे टेन्शन नाही़ तरीही अनेक वॉर्डामध्ये अपु:या पाणीपुरवठय़ामुळे मुंबईकर हैराण आहेत़ कुर्ला आणि घाटकोपर वॉर्डामध्ये तर गेल्या आठ महिन्यांपासून पाण्याची बिलेच पोहोचली नाहीत, अशी तक्रार स्थानिक नगरसेविका अनुराधा पेडणोकर आणि प्रवीण छेडा यांनी केली़ पाण्याचे बिल मिळवण्यासाठी लोकांनाच वॉर्डार्पयत जावे लागत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून काही वॉर्डामध्ये अपुरे तर कुठे पाणीपुरवठाच होत नाही़ तरीही बिल मात्र वसूल करण्यात येत आह़े त्यामुळे जेवढे दिवस पाणीपुरवठा नाही त्या दिवसांचे शुल्क कमी करून बिल पाठवावे, असे नगरसेवकांनी सुचविल़े मात्र मीटर अनुसारच बिल पाठविण्यात येत असते, असा दावा प्रशासनाने केला़
च्मुंबईत दररोज 37क्क् दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ यापैकी 3क् टक्के म्हणजेच सुमारे 9क्क् दशलक्ष लीटर चोरी व गळतीमध्ये पाणी वाहून जात आह़े
च्वांद्रे विभागात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आह़े त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.