एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत सेवेसाठी पाठवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST2020-12-02T04:04:59+5:302020-12-02T04:04:59+5:30

लोकप्रतिनिधींची परिवहन मंत्र्यांना विनंती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट वाहतुकीसाठी विविध जिल्ह्ंयातील चालक आणि वाहकांची नियुक्ती ...

Do not send ST employees to Mumbai for service | एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत सेवेसाठी पाठवू नका

एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत सेवेसाठी पाठवू नका

लोकप्रतिनिधींची परिवहन मंत्र्यांना विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट वाहतुकीसाठी विविध जिल्ह्ंयातील चालक आणि वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण कर्मचाऱ्यांअभावी त्या त्या भागातील सेवेत खंड पडत असल्याने चालक, वाहकांची मुंबईत नियुक्ती करू नका, अशी विनंती लोकप्रतिनिधींनी परिवहनमंत्री अनिल परब यांना केली आहेजिंतूर विधानसभा आमदारांनी म्हटले आहे की, परभणी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतुकीसाठी मुंबईत नियुक्त करण्यात आले आहे. पण कर्मचाऱ्यांअभावी ग्रामीण भागातील सेवा बंद पडली आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना मुंबईतच राहावे लागत असल्याने कुटुंबाकडेही दुर्लक्ष होत आहे. तर गेवराई विधानसभा आमदार ॲड. लक्ष्मण पवार म्हणाले की, गेवराई आगारातील दोन तुकड्या मुंबईत गेल्या होत्या, त्यापैकी २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांअभावी तालुक्यातील एसटी सेवा कोलमडली आहे. बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यातील एसटीच्या ४०० कर्मचाऱ्यांपैकी १४६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना शासन स्तरावर औषधोपचार, आर्थिक साहाय्य व शासकीय सुविधा त्वरित पुरविण्यात याव्यात. तसेच या काळात रजा ग्राह्य करावी, या कर्मचाासऱ्यांना पुन्हा मुंबईस कर्तव्यास मनाई करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Do not send ST employees to Mumbai for service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.