आलियाची खिल्ली उडवू नका : प्रीती
By Admin | Updated: June 3, 2014 00:52 IST2014-06-03T00:52:59+5:302014-06-03T00:52:59+5:30
आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामान्यज्ञानामुळे माध्यमांमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे.

आलियाची खिल्ली उडवू नका : प्रीती
>आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामान्यज्ञानामुळे माध्यमांमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. करण जोहरच्या ‘टॉक शो कॉफी विद करण’मध्ये आलियाने सामान्य ज्ञानावर आधारित एका प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले होते. त्यावरून माध्यमांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. शिवाय तिच्या सामान्य ज्ञानावर जोक्स बनवून तिची खिल्ली उडविली जात आहे. आलियाची खिल्ली उडविण्यावर अभिनेत्री प्रीती ङिांटाने आक्षेप घेतला आहे. प्रीतीचे म्हणणो आहे की, आता आलियाची खिल्ली उडविणो थांबविले पाहिजे. आलियाने इतकी मोठी चूक केलेली नाही जितकी तिची खिल्ली उडविली जात आहे. प्रीती म्हणाली, ‘आलिया जेव्हा छोटी होती, तेव्हा तिने माङयासोबत संघर्ष चित्रपटात काम केले होते. त्यावेळी ती केवळ सात वर्षाची होती. आता ती एक यशस्वी अभिनेत्री बनत आहे. आता अशा पद्धतीने तिचे खच्चीकरण करणो योग्य नाही.’