फक्त विरोधासाठी विरोध नको...

By Admin | Updated: December 31, 2014 22:52 IST2014-12-31T22:52:00+5:302014-12-31T22:52:00+5:30

आमीरच्या ‘पीके’ चित्रपटाला धार्मिक संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी या संघटनांनी केली होती.

Do not just protest against the opposition ... | फक्त विरोधासाठी विरोध नको...

फक्त विरोधासाठी विरोध नको...

अनुज अलंकार - मुंबई
आमीरच्या ‘पीके’ चित्रपटाला धार्मिक संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी या संघटनांनी केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘पीके’ चित्रपटावर बंदी घालणार नाही, असे स्पष्ट केले.
मात्र विरोध वाढत असला तरी प्रेक्षक मात्र चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. ही निर्माता विधू विनोद चोप्रा, दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि आमीर खान यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. या चित्रपटाने २०० कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे त्यावरूनच हे सिद्ध होते. वाढता विरोध असूनही लोकांनी या चित्रपटाला दिलेली पसंतीची पावती कौतुकास्पद आहे. एकंदरीत हा विरोध का वाढत आहे ते पाहणेही महत्त्वाचे ठरेल. मात्र जे विरोध करत आहेत त्यांनाही अनेक प्रश्न व्ािंचारावेसे वाटतात. जे लोक हिरानी, आमीर यांच्याविरोधात तक्रारी करत आहेत तसेच त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी मागणी करत आहेत. त्यांनी एका गोष्टीची माहिती ठेवावी की सेन्सॉर संमत झाल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होत नाहीत. या चित्रपटाने सेन्सॉरच्या सर्व नियमांचे पालन केले म्हणूनच त्यांना सर्टिफिकेट मिळाले. धर्मासारख्या संवेदनशील मुद्द्याबाबतही सेन्सॉरचे काही नियम आहेत. त्यांचे पालन केले जाते. जर कोणत्याही चित्रपटात काही वादग्रस्त आढळले तर ते बदलल्याशिवाय चित्रपटाला सेन्सॉरची मंजुरी मिळत नाही. सरकारी स्तरावर काम करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. मात्र गरज भासल्यास त्यांच्या निर्णयांना न्यायालयात आव्हानही देता येते. आश्चर्याची बाब अशी की, चित्रपटाच्या विरोधात ज्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत त्यात सेन्सॉर बोर्डाचा साधा उल्लेखही नाही. जर चित्रपटाबाबत कोणतीही अडचण असेल तर त्यासाठी बोर्डाला जबाबदार धरले पाहिजे. कारण सर्व नियमांचे पालन करत त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास संमती दिली. याव्यतिरिक्तही विरोध करणारे न्यायालयात जाऊ शकतात, त्यांना तशी संधीही असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Do not just protest against the opposition ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.