शिक्षण दिनाचाच पडला विसर!

By Admin | Updated: November 11, 2014 00:57 IST2014-11-11T00:57:05+5:302014-11-11T00:57:05+5:30

देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून शाळांमध्ये साजरा करण्यात येतो.

Do not forget to fall on education! | शिक्षण दिनाचाच पडला विसर!

शिक्षण दिनाचाच पडला विसर!

मुंबई : देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस  शिक्षण दिन म्हणून शाळांमध्ये साजरा करण्यात येतो. त्यानुसार दरवर्षी शिक्षण विभागाकडून हा दिन साजरा करण्याचे निर्देश देण्यात येतात. परंतु शिक्षण दिनाला काही तास शिल्लक असतानाही शिक्षण विभागाकडून याबाबत कोणतेच आदेश न आल्याने मुख्याध्यापक संभ्रमात पडले आहेत.
गांधी जयंती आणि सरदार पटेल जयंतीदिनी शिक्षण विभागाने शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचे तातडीने आदेश दिले होते. परंतु मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 11 नोव्हेंबर या जन्मदिनी शाळांमध्ये शिक्षण दिन साजरा करण्याबाबत शिक्षण विभागाने साधे परिपत्रक काढण्याचे कष्ट घेतले नाहीत. शाळांनी वार्षिक वेळापत्रकानुसार शिक्षण दिन साजरा करण्याची तयारी केली असून दरवर्षीप्रमाणो यंदाही शाळा शिक्षण दिन साजरा करणार आहेत. मात्र, शाळांनी शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणावर नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
 
शिक्षणमंत्र्यांचे आवाहन
च्मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनी शाळांनी शिक्षण दिन म्हणून साजरा करावा, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रात्री उशिरा केले. शिक्षकांनी मौलाना आझाद यांच्या जीवनचरित्रची विद्याथ्र्याना ओळख करून द्यावी, असेही प्रसारमाध्यमांना कळविले आहे.
 
मौलाना आझाद यांच्या फोटोसाठी शाळांची धावपळ
च्देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा फोटो बहुतांश शाळांकडे नाही. बाजारात आझाद यांचा फोटो सहज उपलब्ध होत नसल्याने तो मिळविण्यासाठी सोमवारी शाळांची धावपळ उडाली. इंटरनेटवर त्यांचा असलेला फोटो खूपच लहान आकाराचा असल्याने मोठय़ा फोटोसाठी दिवसभर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा:यांची पळापळ झाली.
च् मौलाना आझाद यांचा फोटो उपलब्ध होत नसल्याने शिक्षकांची ऐनवेळी धावपळ उडते. परंतु शासनाने त्यांचा मोठा फोटो शाळांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी केली आहे. तसेच शिक्षण विभागाकडून शिक्षण दिन साजरा करण्याबाबत पत्र आले नसले तरी शाळा हा दिवस साजरा करतील, असेही रेडीज म्हणाले.

 

Web Title: Do not forget to fall on education!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.