‘पंतप्रधानांच्या भाषणाची विद्याथ्र्यावर सक्ती नको’
By Admin | Updated: August 31, 2014 02:52 IST2014-08-31T02:52:13+5:302014-08-31T02:52:13+5:30
पंतप्रधान मोदींचे शिक्षक दिनी होणारे भाषण प्रत्येक शाळेत ऐकविण्याची केंद्र सरकारची सक्ती आश्चर्यजनक आहे.
‘पंतप्रधानांच्या भाषणाची विद्याथ्र्यावर सक्ती नको’
मुंबई : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार असून, याचे प्रक्षेपण विविध माध्यमांमार्फत सर्व शाळांमधील विद्याथ्र्यार्पयत पोहोचविण्याचे आदेश केंद्र शासनाने राज्यांना पत्रन्वये दिले आहेत. या निर्णयावर शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कार्यक्रमाच्या आयोजनावरून शिक्षकांपुढे पेच निर्माण झाला आहे.
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण होणार असून, त्याचे प्रक्षेपण टीव्ही, इंटरनेट, रेडिओ इत्यादीमार्फत सर्व शाळांमधील विद्याथ्र्यार्पयत पोहोचविण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 4.45 या वेळेत हे भाषण होणार असल्याने या वेळी विद्याथ्र्याना टीव्हीसमोर बसविण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. परंतु राज्यातील बहुतांश शाळांनी गणोशोत्सवाची पाच ते दहा दिवसांची सुट्टी दिली आहे. पाच दिवसांच्या सुट्टीनंतर शाळा 5 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहेत. परंतु शाळांमध्ये शिक्षक दिन साजरा होणार असल्याने मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर पंतप्रधानांचे भाषण विद्याथ्र्याना कसे दाखवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक शाळांमध्ये अपु:या सोयी-सुविधा आहेत. गणोशोत्सवाच्या सुटीनंतर शाळा 5 सप्टेंबरला भरणार आहेत. याच दिवशी मुख्याध्यापकांना या कार्यक्रमाची तयारी करणो अशक्य होईल. बहुतांश शाळा दोन सत्रंत भरत असल्याने सर्व विद्याथ्र्याना एकाच ठिकाणी बसवणो अशक्य असल्याने दुस:या दिवशीही या कार्यक्रमाचे प्रसारण होणो गरजेचे असल्याचे महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या भाषणाची उत्सुकता असली तरी शाळांना सुट्टी असल्याने विद्याथ्र्याना बोलावणो शिक्षकांसाठी दिव्य असेल, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले. गुजरातमध्ये दीनानाथ बात्र यांच्या प्रयोगाने अठराव्या शतकातील समाजमूल्यांकडे विद्याथ्र्याना नेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पंतप्रधान भाषणातून शिक्षकांना आणि विद्याथ्र्याना काय संदेश देतात याची सर्वानाच उत्सुकता आहे. मात्र, हे भाषण ऐकण्यासाठी विद्याथ्र्याना सक्ती न करता ते घरी बसून ऐकता यावे, असे लोकभारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
..ही तर हुकूमशाही!
पंतप्रधान मोदींचे शिक्षक दिनी होणारे भाषण प्रत्येक शाळेत ऐकविण्याची केंद्र सरकारची सक्ती आश्चर्यजनक आहे. हे हुकूमशाही मानसिकतेचे निदर्शक आहे. किती विद्याथ्र्यानी हे भाषण ऐकले हे कळावे यासाठी त्याच दिवशी पटसंख्येचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शिक्षक दिनी शिक्षकांचा गौरव करण्याऐवजी त्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. पंतप्रधानांचे भाषण प्रसारित करण्याची सक्ती अन्यायकारक आहे. लोकशाहीच्या मूळ संकल्पनेला छेद देणा:या या निर्णयाचा विचारवंत आणि शिक्षकांनी विचार करण्याची गरज आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी
व्यक्त केले.