Join us  

सभासदत्व न दिल्यास मेंटेनन्सही देऊ नका; न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 11:12 PM

गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या सदनिकाधारकाला सभासदत्व दिल्यानंतरच त्याच्याकडून मासिक शुल्क घेण्यास संंस्था पात्र ठरणार आहे. सभासदत्व नाही तर संंस्थेस मासिक शुल्कही द्यायची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सहकार न्यायालयाने दिला आहे.

- अजय महाडीकमुंबई : गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या सदनिकाधारकाला सभासदत्व दिल्यानंतरच त्याच्याकडून मासिक शुल्क घेण्यास संंस्था पात्र ठरणार आहे. सभासदत्व नाही तर संंस्थेस मासिक शुल्कही द्यायची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सहकार न्यायालयाने दिला आहे.राहत असलेल्या सहकारी गृहनिर्माण संंस्थेत सभासदत्वासाठी जर तुम्ही अर्ज दिला असेल व ती तुम्हाला सभासदत्व देत नसेल, तर तुम्ही तिचे मासिक शुल्क (मेंटेनन्स) देणे लागत नाही व त्यासाठी जबरदस्ती गृहनिर्माण संंस्था कायद्याने करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल ३० जून २०१८ रोजी सहकार न्यायालयाने दिला आहे.वसईतील स्वीट सहारा सहकारी गृहनिर्माण संंस्था, मालोंडे, राखेआळी वसई (पश्चिम) येथे राहणारे चंद्रकांत कदम यांनी सहकार न्यायालयात गृहनिर्माण संंस्थेच्या तत्कालीन पदाधिकाºयांच्या मनमानी कारभाराविरोधात याचिका दाखल केली होती.याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. यज्ञेश कदम यांनी युक्तिवाद केला. त्यावरील सुनावणीत न्यायमूर्ती एस.एस. काकडे यांनी गृहनिर्माण संंस्थेच्या पदाधिकाºयांच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढले. काय आहे निकालसहकार न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस. काकडे यांनी गृहनिर्माण संंस्थेला दंड ठोठावितांना म्हटले की, जर गृहनिर्माण संंस्था ही एखाद्या फ्लॅटधारकाला सभासदत्व देण्यास टाळाटाळ करत असेल, तर तिला फ्लॅटधारकाकडून कोणतेही शुल्क वसुल करण्याचा अधिकार नसेल. तसेच फ्लॅटधारक हा सभासदत्वापूर्वीचे कुठल्याही प्रकारचे देणी देणे लागत नाही, असे त्यांनी निकालात स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग