Join us

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा ३१ हजार बोनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:46 IST

बोनसबाबत आयुक्त भूषण गगराणी यांनी पहिल्यापासून सकारात्मक  भूमिका घेतली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३१ हजार रुपये बोनस जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात दोन हजारांची वाढ करण्यात आली आहे. 

५० हजार बोनस मिळावा अशी कामगार संघटनांची मागणी होती. बोनस संदर्भात कामगार संघटना आणि प्रशासनात गेल्या काही दिवसांपासून बोलणी सुरू होती. बोनसबाबत आयुक्त भूषण गगराणी यांनी पहिल्यापासून सकारात्मक  भूमिका घेतली होती. 

अधिकारी ते कर्मचाऱ्यांपर्यंत कुणाला, किती मिळणार बोनस? अधिकारी, कर्मचारी : ३१,००० रुपयेअनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी : ३१,००० रुपयेमहापालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक : ३१,००० रुपयेमाध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/ विनाअनुदानित) : ३१,००० रुपये

माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित) : ३१,००० रुपयेअध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित) : ३१,००० रुपयेअध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित) : ३१,००० रुपयेसामाजिक आरोग्य स्वयंसेविका भाऊबीज भेट : १४,००० रुपयेबालवाडी शिक्षिका/मदतनीस भाऊबीज भेट : ५,००० रुपये

टॅग्स :मुंबई महानगरपालिका