जिल्ह्यात 133 मिमी पावसाची नोंद
By Admin | Updated: July 7, 2014 23:44 IST2014-07-07T23:44:44+5:302014-07-07T23:44:44+5:30
जिल्ह्यातील 15 तालुक्यात आज 133.32 मिमीपाऊस पडला असून सरासरी क्8.31 मिमी. या पावसाची नोंद झाली. उष्णतेत वाढ झाल्यामुळे नागरिक हैराण झाले होते व पावसाची वाट पहात होते.

जिल्ह्यात 133 मिमी पावसाची नोंद
ठाणो : जिल्ह्यातील 15 तालुक्यात आज 133.32 मिमीपाऊस पडला असून सरासरी क्8.31 मिमी. या पावसाची नोंद झाली. उष्णतेत वाढ झाल्यामुळे नागरिक हैराण झाले होते व पावसाची वाट पहात होते. दुपारी अचानक काळोख पडून 4 वाजता पाऊस सुरू झाला. ग्रामीण व शहरी भागात पडलेल्या या पावसामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचा दावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून स्पष्ट करण्यात आले आहे. आजर्पयत जिल्ह्यात तीन हजार 44 मिमी पाऊस पडला असून सरासरी 2क्2.93 मिमी या पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज मात्र वसई, पालघर, डहाणू, भिवंडी आदी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. याशिवाय धरण परिसरात केवळ भातसा धरणात 7 मिमी, वांद्री धरणात 2 मिमी आणि तानसामध्ये क्.2क् मिमी तुरळक पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे दिवसभरात ठिकठिकाणी रिमझीम पडलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. दैनंदिन व्यवहारावर त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. लोकल गाडय़ांसह एसटी बसेस दैनंदिन वेळापत्रकानुसार धावत होत्या. तर या पावसामुळे ग्रामीण भागात सुरू असलेली पाणी टंचाई कमी होणार आहे. (प्रतिनिधी)
तालुकाआजचा पाऊस
ठाणो08.78 मिमी
कल्याणक्9.17
मुरबाडक्4.55
उल्हासनगरक्7.क्8
अंबरनाथक्8.32
भिवंडीक्9.95
शहापूरक्5.क्1
वसई17.71
तालुकाआजचा पाऊस
जव्हारक्5.2क्
विक्रमगडक्5.94
मोखाडाक्4.33
वाडाक्4.49
डहाणू12.64
पालघर18.56
तलासरी12.59
डोंबिवलीत सरी
च्सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दिवसभर उसंत न घेता संततधार कायम ठेवली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान होते. संध्याकाळी परतीच्या प्रवासातील चाकरमान्यांसह पादचा-यांची त्रेधातिरपीट उडाली. भाजीमार्केटसह स्थानक परिसरात नागरिकांना आडोसा शोधावा लागत होता.
च् सकाळच्या वेळी शाळेत गेलेले विद्यार्थी दुपारी साडेबाराच्या सुमारास सुटल्यानंतर बहुतांशी विद्याथ्र्याना मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद लुटला. लहानग्यांच्या आनंदाला उधाण आले होते. सोमवारचा दिवस असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठ बंद होती, त्यामुळे पावसाच्या सरींपासून वाचविण्यासाठी अनेकांसह फेरीवाल्यांनी त्या बंद दुकांनासमोरच्या शेडचा आधार घेतला.
च्पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. गेले आठवडाभरापासून उकाडय़ाने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला.
शेतकरी समाधानी
च्ग्रामीण भागात शेतकरीवर्गात पावसामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आजपर्यंत 7क् टक्के पेरण्यापूर्ण झाल्या असून उर्वरित राहिलल्या 3क् टक्के पेरण्यांसाठी शेतक:यांमध्ये धावाधाव सुरू झाली आहे. पावसा अभावी पेरण्यांची काही कामे थांबली होती. ती आता पूर्ण होतील.